IAF -अग्निवीर भरतीचे वेळापत्र जाहीर!! जाणून घ्या नोंदणीची व भरतीची तारीख|Indian Air Force Agniveer Bharti 2022
अग्निवीर भरती संदर्भातील महत्त्वाची माहिती व मुद्दे
- 10वी पास ते डिप्लोमा धारक किंवा व्यावसायिक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- अर्जाची प्रक्रिया अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर सुरू होईल.
- भरतीचे संपूर्ण वेळापत्रक (The whole schedule) संकतेस्थळावर दिले आहे.
- अग्निवीरांना ४ वर्षांच्या सेवेनंतर सेवा निधी पॅकेज मिळेल. 11.7 लाखांच्या या पॅकेजवर कोणताही कर लागणार नाही.
- यासोबतच अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र (Agniveer Skills Certificate) आणि इयत्ता 12वी समकक्ष पात्रता प्रमाणपत्रही उपलब्ध असेल.
- जे उमेदवार 10वी उत्तीर्ण आहेत त्यांना 4 वर्षांनंतर 12वी समतुल्य उत्तीर्ण प्रमाणपत्र देखील मिळेल, ज्याचा संपूर्ण तपशील नंतर जाहीर केला जाईल.
IAF अग्निपथ योजना 2022: महत्त्वाच्या तारखा
पहिला टप्पा:-
- नोंदणी सुरू होण्याची तारीख – 24 जून 2022
- नोंदणीची अंतिम तारीख – 05 जुलै 2022
- स्टार परीक्षा (ऑनलाइन) – 24 जुलै 2022 ते 31 जुलै 2022
- फेज 2 प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2022
दुसरा टप्पा:-
- दुसरा टप्पा आयोजित – 21 ऑगस्ट 2022 ते 28 ऑगस्ट 2022
- वैद्यकीय – 29 ऑगस्ट 2022 ते 8 नोव्हेंबर 2022
- निकाल आणि नाव नोंदणी
- तात्पुरती निवड यादी- 1 डिसेंबर 2022
- नाव नोंदणी यादी आणि कॉल लेटर – 11 डिसेंबर 2022
- नाव नोंदणी कालावधी – 22 डिसेंबर 2022 ते 29 डिसेंबर 2022
- अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख – 30 डिसेंबर 2022
पात्रता:-
- जनरल ड्युटी (GD) शिपाई भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण राहील. 10वी-12वी उत्तीर्ण तरुणांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये संधी दिली जाईल.
वयो मर्यादा:-
- 17.5 वर्षे ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
पगार किती असेल?
अग्निवीरला पहिल्या वर्षी 30 हजार महिन्यांचा पगार मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी अग्निवीरमध्ये ती वाढून रु.33 हजार, तिसर्या वर्षी रु.36.5 हजार आणि चौथ्या वर्षी रु.40 हजार होईल. दरम्यान, प्रत्येक वेळी त्यांच्या पगारातून निवृत्ती पॅकेजसाठी 30-30 टक्के कपात केली जाईल. उदाहरणार्थ, पहिल्या वर्षी ३० हजार रुपये मिळतील. मात्र यातून केवळ २१ हजार रुपयेच हाती येतील. उर्वरित 30 टक्के म्हणजेच 9 हजार रुपये अग्निवीर कॉर्प्स फंडमध्ये जमा केले जातील. सरकारही तेवढीच रक्कम (९ हजार रुपये) या निधीत टाकणार आहे. हे पैसे चार वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सेवा निधी म्हणून उपलब्ध होतील.
असा करा अर्ज
- इच्छुक आणि पात्र उमेदवार 24 जूनपासून अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर जाऊन सहजपणे अर्ज करू शकतील.