पवनहंस लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी
Pawan Hans Limited Recruitment 2021
Pawan Hans Limited Bharti 2021
भारत सरकारअंतर्गत येणाऱ्या पवनहंस लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे . पवनहंस लिमिटेडमध्ये ट्रेनी पदांची भरती केली जात आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. निवड झालेल्या उमेदवाराला एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर, प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञांसोबत ज्युनिअर टेक्निशियन लेव्हल १ मध्ये पुन्हा तीन वर्षांच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट केले जाईल. एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर, निवडलेल्या उमेदवारांना कंपनीच्या आवश्यकतेनुसार भारतात कोठेही भरती केले जाऊ शकते.
एकुण जागा / Total Post :- 28 जागा
पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञशैक्षणिक पात्रता – उमेदवारांकडे मेकॅनिकल/एरोनॉटिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन यापैकी एकात डिप्लोमा असणे गरजेचे आहे.
एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थेतून तीन वर्षे अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. किंवा
डीजीसीए मान्यताप्राप्त संस्थेतून एएमई अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. किंवा DGCA मान्यताप्राप्त संस्थेकडून B1.3 किंवा B2 श्रेणीतील विमान अभियांत्रिकी देखभाल अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.